Turkey Erdogan : …तरी पाकिस्तानला मदत करतच राहणार, तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना 'प्रिय भाऊ' म्हटले आहे. एर्दोगन म्हणाले की, तुर्की भविष्यातही चांगल्या आणि वाईट काळात पाकिस्तानच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे
भारताविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या तुर्कीने पुन्हा एकदा दहशतवादाला आश्रय देणाऱ्याला पाठिंबा दिला आहे. चांगल्या आणि वाईट काळात नेहमीच पाकिस्तानसोबत उभं राहू, असं म्हणत तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी काल एक ट्वीट केले होतं. यानंतर आज पुन्हा एकदा रेसेप तय्यीप एर्दोगन हे बरळल्याचे पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या नुकसानाचा विचार न करता तुर्की पाकिस्तानला मदत करतच राहणार असल्याचे एर्दोगन यांनी म्हटलं आहे. तर नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमध्ये एर्दोगन यांनी असे म्हटले होते की, पाकिस्तानच्या बंधू भावांच्या लोकांसोबत आम्ही उभं राहू. छुपी मदत पाठवणाऱ्या तुर्कस्तानकडून आता पाकिस्तानला उघड पाठिंबा देण्यात येत आहे. या पाठिंब्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शकीफ यांनी प्रतिक्रिया देत आभार व्यक्त केले आहे.
