VIDEO : आधी मंत्रालय आता विधानभवन? सगळीकडे हाणामारी, महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?

VIDEO : आधी मंत्रालय आता विधानभवन? सगळीकडे हाणामारी, महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?

| Updated on: Jul 18, 2025 | 7:11 AM

आधी सत्ताधारी आमदारांनी निकृष्ट जेवणाच्या आरोपावरून मंत्रालय कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि त्यानंतर आता गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी विधानभवनाच्या लॉबीमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांना मारहाण केली आहे.

महाराष्ट्रात नेमकं चाललय तरी काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण गेल्या पंधरा दिवसात मंत्रालय आणि विधानभवनामध्ये हाणामारीची ही दुसरी घटना घडली आहे. आधी आमदारांना मंत्रालयाच्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारलं. संजय गायकवाड यांनी निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप करत आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केलेली होती आणि त्यानंतर आज पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये जोरदार हाणामारी पाहायला मिळाली. पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुखला मारहाण केल्याची बाब समोर आलेली आहे. दरम्यान या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी आता दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे. असं असलं तरी विधानसभेच्या परिसरामध्ये घडलेली ही घटना त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर कारवाईचा आश्वासन देखील दिलं आहे.

Published on: Jul 17, 2025 09:01 PM