Railway Megablock : मुंबईकरांनो… येत्या शनिवारीच मध्य रेल्वेवर दोन विशेष ब्लॉक, कोणत्या स्थानकावरील प्रवाशांची होणार गैरसोय?
मुंबईकरांनो... येत्या शनिवारीच मध्य रेल्वेवर दोन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. नेमकं कोणत्या स्थानकावरील प्रवाशांची होणार गैरसोय? जाणून घ्या...
मुंबईकरांनो तुमच्यासाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर मुंबई लोकलने शनिवारी प्रवास करणार असाल तर तुमची गैरसोय होऊ शकते. कारण भायखळा रेल्वे स्थानकावर फुट ओव्हर ब्रिज गर्डर्स बसवण्यासाठी आणि शीव स्थानकावर सार्वजनिक पादचारी पूलाचे फूट ओव्हर ब्रिज गर्डर्स बसवण्यासाठी दोन विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे भायखळा स्थानकावर फुट ओव्हर ब्रिजचे ४ स्टील गर्डर्स बसवण्यासाठी 110MT रोड क्रेन वापरून आणि शीव रेल्वे ओव्हर ब्रिज येथे सार्वजनिक फुट ओव्हर ब्रिज चा ४० मीटर स्पॅन बसवण्यासाठी 250T रोड क्रेन वापरून दोन विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स घेण्यात येत आहे. शनिवारी रात्री १२.३० वाजल्यापासून ०४.३० वाजेपर्यंत तर दादर ते कुर्ला दरम्यान १.१० ते ४.१० पर्यत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे
Published on: Sep 26, 2025 11:37 AM
