Uday Samant : ती माहिती… उदय सामंतांनी गोगावलेंच्या ‘त्या’ दाव्यातील हवाच काढली

Uday Samant : ती माहिती… उदय सामंतांनी गोगावलेंच्या ‘त्या’ दाव्यातील हवाच काढली

| Updated on: Jun 15, 2025 | 3:48 PM

रश्मी ठाकरे यांचे नाव न घेता भरत गोगावले यांनी फुटीमागील अनेक कारणांपैकी रश्मी ठाकरे पण एक कारण असल्याचे म्हटले आहे. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

शिंदेच्या शिवसेनेचे कोकणातील शिलेदार भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरे यांच्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकले नाहीत. तसेच रश्मी ठाकरे यांच्यामुळे शिवसेना फुटली, असा गंभीर आरोप भरत गोगावले यांनी केला. भरत गोगावले यांच्या दाव्यावर शिवसेनेचे नेते, मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. भरत गोगावले यांना ती माहिती कुठून मिळाली माहिती नाही, असे म्हणत उदय सामंत यांनी गोगावलेंच्या दाव्यातील हवाच काढून टाकली. पुढे ते असेही म्हणाले. माझ्यासकट कोणत्याही महायुतीच्या मंत्र्याला महायुतीवर बोलण्याचा अधिकार नाही. महायुतीतील शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यावर बोलू शकतात. माझ्या सारख्या कार्यकर्त्याला यावर बोलण्याचा अधिकार नाही, असंही उदय सामंत म्हणाले. बघा व्हिडीओ

Published on: Jun 15, 2025 03:48 PM