Uddhav Thackeray : ओला दुष्काळावरून ठाकरेंनी काढलं जुनं पत्र अन् फडणवीसांना घेरलं तर ‘लाडकी बहीण’वरून शिंदेंवर निशाणा

Uddhav Thackeray : ओला दुष्काळावरून ठाकरेंनी काढलं जुनं पत्र अन् फडणवीसांना घेरलं तर ‘लाडकी बहीण’वरून शिंदेंवर निशाणा

Updated on: Oct 02, 2025 | 11:21 AM

दसरा मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत ओला दुष्काळ, शेतकऱ्यांना मदत आणि कर्जमाफीच्या मुद्द्यांवरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. फडणवीसांचे जुने पत्र सादर करत, त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली, तसेच लाडकी बहीण योजनेवरूनही सरकारला धारेवर धरले.

दसरा मेळाव्याच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओल्या दुष्काळाच्या मुद्द्यावरून घेरले. फडणवीस यांनी ओला दुष्काळ कधीही जाहीर झालेला नाही असे म्हटले असताना, उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते असताना फडणवीस यांनीच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणारे पत्र दिले होते, हे दाखवून दिले. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी त्यांनी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत आणि कर्जमाफीची मागणी केली. याशिवाय, उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरही टीका केली. निवडणुकीच्या वेळी दिलेल्या हप्त्यांप्रमाणे आता पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते देण्याची मागणी त्यांनी केली, तसेच या योजनेला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला.

Published on: Oct 02, 2025 11:21 AM