‘तुटक्या-फुटक्या एसटीवर स्वतःचा हसरा फोटो लावताना..’, उद्धव ठाकरे यांचा शिंदे फडणवीस सरकारवर घणाघात

‘तुटक्या-फुटक्या एसटीवर स्वतःचा हसरा फोटो लावताना..’, उद्धव ठाकरे यांचा शिंदे फडणवीस सरकारवर घणाघात

| Updated on: Mar 05, 2023 | 9:10 PM

VIDEO | तुटलेल्या फुटलेल्या एसटी बसवरील गतिमान महाराष्ट्र या जाहिरातबाजीवरून उद्धव ठाकरे यांनी नेमकी काय केली टीका?

रत्नागिरी : महाराष्ट्राच्या बाहेर सगळे उद्योग घालवायचे आणि तुटलेल्या फुटलेल्या एसटी बसवर गतिमान महाराष्ट्र अशी जाहिरात लावायची. काचा फुटल्यात, कशी तरी ती एसटी लडखळत आहे. एसटी महामंडळाचे काय हाल आहेत. ते आज आम्हाला माहिती आहे. मात्र त्यावर गतिमान महाराष्ट्राच्या जाहिरातीवर हसरा चेहरा लावायचा म्हणजे उद्योगांप्रमाणे कर्नाटकात पाठवून देतो अशी भावना असलेली दिसते. लाज लज्जा शरम काहीही वाटत नाही. कोणत्याही सुविधा नाही मात्र स्वतःचा हसरा फोटो बाहेर लावताना लाज वाटत नाही, या शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे आज उद्धव ठाकरेंची जाहीर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर चांगलाच निशाणा साधला. अधिवेशनात सभागृहात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी एसटीवरील सरकारी जाहिरातबाजीवर शिंदे सरकारला घेरल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी देखील शिंदे सरकारच्या या सरकारी जाहिरातीवरून पुन्हा शिंदे फडणवीस सरकारवर टीका केल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Mar 05, 2023 09:10 PM