Thackeray Brothers : जागावाटपाला वेग? 2 तासांपासून शिवतीर्थवर खलबंत, ठाकरे बंधूंच्या भेटीत काय चर्चा?
जागावाटपावरून निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली. अर्ध्या तासाहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीत दोन्ही पक्षांतील जागावाटपाच्या धोरणावर चर्चा झाली. मनसेला ८० ते १०० जागा हव्या असून, शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भर २०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील आकडेवारीवर आहे.
जागावाटपावरून निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली. जवळपास अर्ध्या तासापासून ही महत्वपूर्ण चर्चा सुरू आहे. यापूर्वी झालेली जागावाटपाची पहिली बैठक समाधानकारक न झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांना स्वतः राज ठाकरेंना भेटायला यावे लागल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
मनसेने येत्या निवडणुकीत ८० ते १०० जागांची मागणी केली आहे. यात ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी एक जागा आणि मराठी बहुल तसेच शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात दोन ते तीन जागांचा समावेश आहे. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील जागावाटपाच्या सूत्रावर ठाम आहे, तर मनसे २०२२ नंतरच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार नवीन धोरणाची मागणी करत आहे. संजय राऊत यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे उद्धव ठाकरे यांना स्वतः वाटाघाटीसाठी पुढाकार घ्यावा लागला आहे.
