बऱ्याच वर्षाने राजने घरी येऊन..; भावाविषयी बोलताना उद्धव ठाकरे भावुक

बऱ्याच वर्षाने राजने घरी येऊन..; भावाविषयी बोलताना उद्धव ठाकरे भावुक

| Updated on: Jul 27, 2025 | 3:46 PM

राज ठाकरेंनी मातोश्रीवर येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आनंद द्विगुणीत झाला. नुसता द्विगुणीत नाही. कित्येक पटीने गुणीत झाला आहे. त्यामुळे नक्कीच पुढचा सर्व काळ चांगला होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाठा गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर गेले होते. यावेळी मातोश्रीवर दोन्ही भावांची भेट झाली. यावेळी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज ठाकरे यांनी माझा उल्लेख आपल्या ट्विटमध्ये शिवसेना प्रमुख असा केला यात चुकीचं काय? दोन शिवसेना नाहीच आहे. म्हणून म्हटलं यात चुकीचं काय? आम्ही अनेक वर्षाने भेटलो. ज्या घरात वाढलो तिथे भेटलो. ज्यांनी आम्हाला वाढवलं त्यांच्या खोलीत गेलो. यात बातमी काय? आज बऱ्याच वर्षाने राजने घरी येऊन शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषेत द्विगुणीत शब्द आहे. पण त्या पेक्षा कित्येक पटीने हा आनंद मोठा आहे, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

Published on: Jul 27, 2025 03:44 PM