Uddhav Thackeray : आम्ही एकत्र आल्यास मिरची का लागते? उद्धव ठाकरे यांचा भाजपला थेट सवाल करत घणाघात

Uddhav Thackeray : आम्ही एकत्र आल्यास मिरची का लागते? उद्धव ठाकरे यांचा भाजपला थेट सवाल करत घणाघात

| Updated on: Jan 10, 2026 | 1:00 PM

राजकारणात दोन भाऊ एकत्र आल्यास भाजपला मिरची का लागते, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि मुंबईचे मराठीपण टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना फोडल्याचा आरोप करत, मुंबई मराठी माणसाचीच राहील असे त्यांनी ठामपणे सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका करत, राजकारणात आपण आणि राज ठाकरे एकत्र आल्यास त्यांना मिरची का लागते, असा सवाल उपस्थित केला. ठाकरे यांनी स्पष्ट केले की, त्यांची युती सत्तेसाठी नसून, मराठी माणसाच्या हितासाठी आणि मुंबईचे मराठीपण जपण्यासाठी आहे. मराठी माणसाला मुंबईत घर नाकारले जात आहे, यावर त्यांनी भर दिला. टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे बोलत होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून देत, मोरारजी देसाईंच्या कार्यकाळात मुंबईवर गुजरातचा डोळा होता, हे ठाकरेंनी सांगितले. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या अवहेलनेविरोधात शिवसेना स्थापन केली होती. २०१४ मध्ये भाजपने युती तोडली आणि २०१९ मध्ये पुन्हा पाठीत सुरा खुपसला, असा आरोप ठाकरे यांनी केला. मुंबईवर कब्जा करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपने शिवसेना तोडली आणि मराठी मते फोडण्यासाठी शाहसेनेला जन्म दिला, असा दावा त्यांनी केला. आम्ही सत्ता मिळवून मुंबई मराठी माणसाकडेच ठेवणार, असे ठाकरे यांनी ठामपणे नमूद केले.

Published on: Jan 10, 2026 12:57 PM