Shivsena UBT : ठाकरेंच्या सेनेचे 5 व खासदार शिंदेंच्या गळाला?

Shivsena UBT : ठाकरेंच्या सेनेचे 5 व खासदार शिंदेंच्या गळाला?

| Updated on: Jun 05, 2025 | 4:48 PM

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार शिंदेच्या गटात जाण्याच्या मार्गावर आहेत.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पाच खासदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. आगामी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेतून गळती सुरू झाली आहे. त्यामुळे ठाकरेंना एकामागे एक धक्के बसत आहेत. आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या गटातले 5 खासदार शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, ही आऊटगोइंग थांबवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न सुरू असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षांतर बंदीच्या कायद्याचा फटका बसू नये म्हणून शिंदेंच्या सेनेला आणखी एका खासदाराची गरज आहे. लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण होईल असं देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Published on: Jun 05, 2025 04:48 PM