Uddhav Thackeray : मार्क मिळाले १०० अन् आमची कमळी एक नंबर… ठाकरेंचा भाजपला खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?
आजपासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. आजच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सभागृहाच्या बाहेर बोलत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षांवर जोरदार निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर उद्धव ठाकरे असंही म्हणाले, मार्क मिळाले १०० पैकी १०० आणि आमची कमळी एक नंबर, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जिव्हारी लागणारा खोचक टोला लगावला आहे. ‘आज सगळ्यांच्या घरी मराठी वृत्तपत्र आले असतील मला उत्सुकता आहे की, ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली? मार्क मिळाले १०० पैकी १०० आणि आमची कमळी एक नंबर.. कारण ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली? त्या कमळीवर कोणत्या भाषेची सक्ती होती का? त्या कमळीने १०० मार्क्स कसे मिळवले. की त्या शाळेतपण कमळीने ईव्हीएम वापरलं होतं?’, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तर या कमळीला एक नंबर म्हणणारे नेमके कोण आहेत? हे मला बघायचंय असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
Published on: Jun 30, 2025 02:30 PM
