Uddhav Thackeray : रम्मी, तीन पत्तीला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळणार… ठाकरेंचा खोचक टोला अन् फडणवीसांच्या मूल्यांवरच बोट

Uddhav Thackeray : रम्मी, तीन पत्तीला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळणार… ठाकरेंचा खोचक टोला अन् फडणवीसांच्या मूल्यांवरच बोट

| Updated on: Aug 02, 2025 | 4:45 PM

विधिमंडळातील सभागृहात रमी खेळतानाचे प्रकरण बाहेर आल्यानंतर कोकाटेंचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांनी चांगलीच कंबर कसली होती मात्र तसं न होता कोकाटेंकडील खातं काढून घेण्यात आल्याचे पाहायाल मिळाले.

गेल्या काही दिवसांपासून मंत्री माणिकराव कोकाटे हे चांगलेच चर्चेत होते. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेच्या सभागृहात माणिकराव कोकाटे रम्मी गेम आपल्या मोबाईलवर खेळताना दिसून आले. यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, मात्र मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोकाटेंना समज देत त्यांच्या खात्यात बदल केला आणि कोकाटेंचा राजीनामा न घेता त्यांची कृषीमंत्रीपदावरून उचलबांगडी करून त्यांचं खातं दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आले. तर दत्तात्रय भरणे यांचं खातं माणिकराव कोकाटेंकडे सोपवण्यात आलंय. अशातच यावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

रम्मी, तीन पत्तीला आता ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळेल असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. उद्धव ठाकरे म्हणाले, जो विषय त्याचा आहे तसं त्याला खातं दिलं असावं, नाहीतर कृषी खातं त्यांचं नव्हतं. त्यांनी शेतकऱ्यांची थट्टा आणि मस्करी केली. पण रमी खेळणारा माणूस क्रीडा मंत्री झाला, असं म्हणत ठाकरेंनी निशाणा साधला. यावेळी त्यांनी फडणवीसांवर हल्लाबोल करत फडणवीसांची मूल्य कुठं गेली? असा सवालही केला.

Published on: Aug 02, 2025 04:32 PM