CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार

| Updated on: Apr 02, 2021 | 3:11 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

मुंबई: गेल्या महिन्यापासून राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात तर कोरोना रुग्ण संख्येचा स्फोट झाला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन होणार की कठोर निर्बंध लागू होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.