बापरे! हिरकणी कक्षात स्तनपान नाही तर मद्यपींच्या पार्ट्या, उल्हासनगरमधील पालिकेच्या शाळेत चाललंय काय? व्हिडीओ व्हायरल
स्तनदा माहिलांकरता सरकारकडून हिरकणी कक्षाची विशेष सोय करण्यात आली आहे. मात्र या हिरकणी कक्षात मद्यपान होत असल्याचा आरोप केला जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील पालिका शाळेत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. उल्हासनगर येथील पालिका शाळेत असणाऱ्या हिरकणी कक्षात स्तनपानाऐवजी मद्यपींच्या पार्ट्या होत असल्याची माहिती मिळतेय. स्तनदा माहिलांकरता सरकारकडून हिरकणी कक्षाची विशेष सोय करण्यात आली आहे. मात्र या हिरकणी कक्षात मद्यपान होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे पालिकेच्या शाळा क्रमांक 29 मधील शिकणाऱ्या मुलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. राष्ट्रवादी पवार गटाकडून हा आरोप करण्यात आला आहे. इतकंच नाहीतर हिरकणी कक्ष हा स्तनपानासाठी आहे की मद्यपानासाठी? असा सवालही कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. यासोबत त्यांनी एक व्हिडीओ समोर आणला असून हिरकणी कक्षात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली असता मद्यपींनी धूम ठोकल्याचे सांगितले जात आहे. उल्हासनगर पालिकेच्या शाळा क्रमांक 29 मधील धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला असून त्याचीच सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.
