Pahalgam हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? अमित शाहांकडून बैठकांचा सपाटा, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना काय दिले आदेश?

Pahalgam हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? अमित शाहांकडून बैठकांचा सपाटा, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना काय दिले आदेश?

| Updated on: Apr 25, 2025 | 6:49 PM

गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच सर्व मुख्यमंत्र्यांसह एक बैठक घेतली आहे. यावेळी पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढा अशा शहा यांनी सूचना दिल्या. दुसरीकडे उत्तर कश्मीरमध्ये भारतीय राफेल विमानांच्या रात्रभर घिरट्या सुरू आहेत. लष्करा प्रमुखांकडून देखील नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा घेतला गेलाय.

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत भारत सरकारने दिलेत. यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी बैठकांचा सपाटा लावलाय. शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. सर्व मुख्यमंत्र्यांना राज्यातल्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्याचे निर्देश दिले. यादी मिळाल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढा अशा सूचना अमित शहा यांनी दिल्यात. दरम्यान, अमित शहा यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेतली. सिंधू जल करार अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर झालेली ही बैठक काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत देते आहे. तर दुसरीकडे उत्तर कश्मीरमध्ये भारताच्या राफेल विमानांच्या रात्रभर घिरट्या सुरू आहेत. राजस्थान सीमेवरच्या बीएसएफ फोर्सला सतर्कतेचे आदेश देण्यात आले. भारत पाकिस्तानमधील अटारी बॉर्डर बंद करण्यात आली आहे. अशातच भारतीय लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी श्रीनगर गाठत अतिरिक्त कारवाईची माहिती घेतली. लष्कर प्रमुखांनी नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचाही आढावा घेतला.

Published on: Apr 25, 2025 06:49 PM