रुबाबदार, देखण्या घोड्यांनी फेडलं डोळ्यांचं पारणं; कुठं रंगली अनोखी स्पर्धा

| Updated on: Mar 19, 2023 | 10:10 PM

VIDEO | सांगलीतील घोड्यांच्या स्पर्धेत कर्नाटक, सोलापूर आणि सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील घोड्यांचा सहभाग

Follow us on

सांगली : सांगलीत घोड्याच्या अनोख्या स्पर्धा रंगल्या असून या स्पर्धेत रूबाबदार, देखणे आणि बलाढ्य घोडे सहभागी झाले होते. स्वर्गीय वज्रदेही पैलवान हरिनाना पवार आणि स्वर्गीय बिजली मल्ल पैलवान संभाजी पवार यांच्या स्मृती दिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जातिवंत घोड्यांचे आणि घोड्यांचे चालीचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात घोड्यांनी आपली कला सादर केली. या स्पर्धा पाहण्यासाठी सांगलीकरांनी एकच गर्दी केली होती. रुबाबदार, देखण्या, घोड्यांनी सगळ्यांच्या डोळ्याची पारणं फेडली. कोरोना काळानंतर या स्पर्धेत साधारण 21 घोडे सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी कर्नाटक, सोलापूर आणि सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातून घोडे आले होते. या स्पर्धेत प्रत्येक घोड्यांनी आपले प्रदर्शन दाखवले. यानंतर या स्पर्धेतील विजेते घोषित करण्यात आले आणि पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांकाच्या घोड्याला बक्षीस देण्यात आले.