Unseasonal Rain : कांदा पुन्हा रडवणार; अवकाळीमुळे कांद्याचं पीक सडण्यास सुरुवात

Unseasonal Rain : कांदा पुन्हा रडवणार; अवकाळीमुळे कांद्याचं पीक सडण्यास सुरुवात

| Updated on: May 25, 2025 | 4:44 PM

Unseasonal rain damage : राज्यात अवकाळी पावसाने फळबागा आणि पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून पाणी लागल्याने काढणीला आलेले उन्हाळ कांदे सडायला सुरुवात झाली आहे.

राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने सामान्य नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पाडली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचे उन्हाळी पिकं वाया गेले आहेत. फळबागा बरोबरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील अवकाळीचा फटका बसला आहे.

राज्यातल्या अनेक भागात उन्हाळ कांद्याचं पीक मोठ्याप्रमाणात घेतलं जातं. या कांद्यावर मिळणाऱ्या पैशांमुळेच खरीपाच्या पिकांसाठी शेतकऱ्यांना तयारी करता येते. मात्र यंदा अवकाळी पावसाने ऐन कांदे काढणीच्या मोसमातच अवकाळी पावसाने थैमान घातल्याने हे कांद्याचं पीक आता पूर्ण वाया गेलं आहे. काढून ठेवलेल्या कांद्यांना पाणी लागल्याने तब्बल 60 ते 70 टक्के कांदे सडले आहे. काढणीला आलेल्या कांद्यांमध्ये देखील पाणी गेल्याने पूर्ण पीक वाया गेलं आहे. त्यामुळे आता उत्पादनाचा खर्च देखील निघणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

Published on: May 25, 2025 04:34 PM