या अधिवेशनातून शेतकऱ्याला काहीही… अमोल मिटकरी यांचा आरोप

| Updated on: Mar 22, 2023 | 7:53 AM

अधिवेशनाचा तिसरा टप्पा आणि अंतिम आठवडा आता पार पडतोय. उद्या गुढीपाडव्यानिमित्त शासकीय कामकाज होणार नाहीये

Follow us on

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे- फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी मागील अधिवेशनात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही त्याचप्रकारे याही अधिवेशनात शेतकऱ्याला काहीच मिळालं आणि मिळणार नाही हे काळ्या दगडावरची रेष असल्याचा घणाघात केला आहे.

यावेळी मिटकरी यांनी, अधिवेशनाचा तिसरा टप्पा आणि अंतिम आठवडा आता पार पडतोय. उद्या गुढीपाडव्यानिमित्त शासकीय कामकाज होणार नाहीये. पण आतापर्यंतचे जे काही कामकाज विधिमंडळामध्ये झालं ते शेतकऱ्यांच्या दृष्टीने फारसं समाधानकारक झालेलं नाही. असे चित्र या महाराष्ट्रत उभे राहिलेले नाही. तर या अधिवेशनातून शेतकऱ्याला जे अपेक्षित होतं ते काही मिळालेले नाही असही मिटकरी म्हणाले.