Meenatai Thackeray Statue : त्यानं लाल रंगाचा डबा मीनाताईंच्या पुतळ्यावर भिरकवला अन्…पोलिसांकडून मोठी अपडेट समोर
दादरमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकल्याच्या प्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकर यांना दादर कोर्टाने 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे.
दादर येथील शिवाजी पार्क परिसरात असणाऱ्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकल्याच्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकणारा आरोपी उपेंद्र पावसकरला दादर कोर्टाने 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. आरोपीने लाल रंगाचा डबा पुतळ्यावर फेकला होता. या घटनेनंतर या प्रकरणी वेगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांनी कोर्टाला कळविले की, या कृत्यामागील कारण आणि त्यामागे असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेत आहेत. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. पुढील तपासातून काय समोर येतंय? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Published on: Sep 18, 2025 02:53 PM
