Rohit Pawar | RBI चे पैसे लसीकरणासाठी वापरा – आ. रोहित पवार यांचा मोदींना सल्ला
बँकेकडे मागील आर्थिक वर्षात 99 हजार 122 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध झाला आहे. तो केंद्राला पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. (Use RBI money for vaccination, Rohit Pawar's advice to Narendra Modi)
मुंबई : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळाची बैठक झाली. बँकेकडे मागील आर्थिक वर्षात 99 हजार 122 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध झाला आहे. तो केंद्राला पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. हा जुलै 2020 ते मार्च 2021 या 9 महिन्यांच्या कालावधीतील अतिरिक्त निधी आहे. दरम्यान, हा निधी केंद्रानं लसीकरणासाठी वापरावा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
