उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याला ‘या’ संघटनेचा विरोध; MIM ची भूमिका काय?

| Updated on: Mar 08, 2023 | 10:49 AM

उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्याला काही लोकांचा विरोध आहे. आमरण उपोषणाची हाक देण्यात आली आहे. एमएयाएम पक्षाची याबाबत काय भूमिका आहे? पाहा...

Follow us on

उस्मानाबाद : उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्याला काही लोकांचा विरोध आहे. त्यासाठी उस्मानाबाद प्रेमी तरुणांचं आजपासून आमरण उपोषण सुरु आहे. धाराशिव नामकरण विरोधात आता काही उस्मानाबाद प्रेमी तरुण आमरण उपोषण करणार आहेत. तर MIM देखील साखळी उपोषण करणार आहे. ही दोन वेगवेगळी आंदोलनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आहेत. या आंदोलनामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. आजपासून या नामांतर विरोधी आंदोलनाला सुरुवात होणार आहे. धाराशिव नाव बदलताना लोकांची मतं विश्वासात घेतली नाहीत. तसंच आक्षेप न मागवता न्यायलयात हे प्रकरण प्रलंबित असताना नाव बदलण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप करत हे आंदोलन सुरु आहे.