Hagawane Family : ‘तुमच्या बापात दम असेल तर..’; हगवणे पिता पुत्राचा नवा व्हिडीओ व्हायरल

Hagawane Family : ‘तुमच्या बापात दम असेल तर..’; हगवणे पिता पुत्राचा नवा व्हिडीओ व्हायरल

| Updated on: May 27, 2025 | 6:20 PM

Rajendra And Sushil Hagawane : वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणातले आरोपी हगवणे पितापुत्र आता त्यांच्या व्हिडीओसाठी चर्चेत आलेले आहेत. बापलेकाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

हगवणे पिता-पुत्राचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. माझ्या बापाच्या जीवावर हवा करतो आहे, असा उल्लेख या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात आरोपी असलेले हगवणे पितापुत्रावर याच प्रकरणी अनेक गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. हुंड्यासाठी सुनांचा छळ करणारे हगवणे कुटुंब सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांचे बरेच व्हिडीओ आता समोर येत आहेत. यापूर्वी हगवणे कुटुंबाने बैलाचा वाढदिवस साजरा केल्यावर गौतमी पाटील याच कार्यक्रमात बैलासमोर नाचत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात सुशील हगवणेचा माज दिसून येत आहे. सुशील हगवणे हा त्याच्या वडिलांसोबत एका घोड्यावर बसलेला दिसून येत आहे. ‘माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय, तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा’ असे तो बोलत आहे. तो घोड्यावर बसून ऐटीत त्यावर रपेट मारताना दिसतो आहे.

Published on: May 27, 2025 06:19 PM