Vaishnavi Hagawane : हगवणे कुटुंबीयांच्या कारनाम्यांची मालिका संपेना, लाखो रूपये थकवले अन्… नवा आरोप समोर
वैष्णवी हगवणे प्रकरणी वैष्णवीचा पती, दीर सासू, सासरा आणि नणंद यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अशातच तपासाअंतर्गत नवीन माहिती समोर येत आहे.
हगवणे कुटुंबीयांचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे. हगवणे कुटुंबीयानं चित्रपट क्षेत्रातही पैसा लावल्याचे समोर आले आहे. राजेंद्र हगवणे यांचा पुतण्या संतोष हगवणे यानं खुर्ची या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. खुर्ची या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाथ खोचरे पाटील यांचे हगवणे यांनी लाखो रूपये थकवल्याचा आरोप समोर आला आहे. खुर्ची या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाथ खोचरे पाटील यांना हगवणे यांच्याकडून धमक्या यायच्या. यासंदर्भात अविनाथ खोचरे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रारही केली होती. याशिवाय पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडे देखील यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते खुर्ची या मराठी चित्रपटाचं पोस्टर लाँच कऱण्यात आलं होतं.
Published on: May 30, 2025 03:50 PM
