Vedanta Project- सोलापुरात वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्याने युवासेनेची स्वाक्षरी मोहीम

| Updated on: Sep 15, 2022 | 5:55 PM

सोलापूर येथील पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी मोहीम राबवत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे, यावेळी महाराष्ट्र बेरोजगारी वाढत असता सरकारने हा प्रकल्प गुजरातला जाऊ देणे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट असल्याची भावना शिवसेनेने व्यक्त केली आहे.

Follow us on

सोलापूर – सोलापुरात वेदांत प्रकल्प (Vedanta Project)गुजरातला गेल्याने राज्यात सर्वत्रच नाराजीचा सूर उमटला आहे. राज्य सरकारच्या(State Government) निष्काळजीपणामुळे प्रकल्प गुजरातला गेल्याचे   विरोधकांनी म्हटले आहे. एवढं नव्हे तर सरकारच्या विरोधात विरोधी पक्षनेते चांगलेच आक्रमक झाले आहे. यासाठी ठिकठिकाणी आंदोलनेही करण्यात आली. शिवसेनेच्या(Shivsena) सोलापूर येथील पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षरी मोहीम राबवत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे, यावेळी महाराष्ट्र बेरोजगारी वाढत असता सरकारने हा प्रकल्प गुजरातला जाऊ देणे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट असल्याची भावना शिवसेनेने
व्यक्त केली आहे.