Pune : आता याला काय म्हणायचं… नाले सफाईनंतर गाळ पुन्हा नाल्यातच, महानगरपालिकेचा अजब कारभार व्हायरल

Pune : आता याला काय म्हणायचं… नाले सफाईनंतर गाळ पुन्हा नाल्यातच, महानगरपालिकेचा अजब कारभार व्हायरल

| Updated on: May 28, 2025 | 11:02 AM

पुणे महानगरपालिकेचा एक अजब कारभार समोर आला आहे. पुण्यात सफाईनंतर गाळ पुन्हा नाल्यातच टाकल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. पुण्यातील दोन ठिकाणचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत

पुणे महानगरपालिकेचा एक अजब कारभार समोर आला आहे.  नाले सफाईनंतर गाळ पुन्हा नाल्यातच टाकत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. नालेसफाई करताना काढलेला गाळ पुन्हा नाल्यात टाकण्यात येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. एक व्हिडिओ बिबवेवाडी इथला आहे, तर दुसरा व्हिडिओ फुलपाखरू उद्यान सरकारनगरचा आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओच्या निमित्ताने महापालिका प्रशासनाकडून नालेसफाई करताना पुरेशी खबरदारी घेण्यात येत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र यानंतर संबंधित ठेकेदाराची बिले अदा करण्याची कारवाई पूर्ण तपासणी केल्यानंतरच करण्यात येईल, असा खुलासा महापालिकेकडून करण्यात आला आहे. ओढ्याचे नालेसफाई पूर्ण क्षमतेने झाली नसल्याचा प्रकार समोर आला असून या व्हिडिओत ओढ्यातील गाळणी करण्यात येत असल्याने दिसत आहे. त्यात पोकलेन चालक ओढ्याची पात्रातील गाळ पाण्याच्या प्रवाहात सोडून देत असल्याचे दिसत आहे. या समोर आलेल्या प्रकारानंतर ओढ्यातील साफसफाई सुरू आहे की महापालिकेच्या तिजोरीची असा आरोप होत आहे.

Published on: May 28, 2025 11:02 AM