Dombivli : शीssss घाणीच्या पाण्यात चक्क धुतली केळी अन्… विक्रेत्याला झापलं असता बघा काय म्हणाला?
डोंबिवली पश्चिम परिसरात घाणीच्या पाण्यात केळी धुवून विक्रेता आपल्या फळांची विक्री करताना पाहायला मिळाला. घाणीतल्या पाण्यात फळं धुवून विक्री सुरू असल्याने डोंबिवलीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर या फळ विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वत्र होत आहे.
डोंबिवलीतून एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. डोंबिवली पश्चिम परिसरात घाणीच्या पाण्यात चक्क केळं धुतांनाचा व्हिडीओ समोर आला आहे. डोंबिवली पश्चिम परिसरातील एका फळ विक्रेत्याने पावसाच्या साचलेल्या पाण्यात आणि घाणीच्या पाण्यात केळं धुतल्याचा प्रकार पाहायला मिळाला. अशा अस्वच्छ पाण्यात फळ विक्रेता केळं धुवून फळांची विक्री करत असल्याचे पाहायला मिळतंय. यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. इतकंच नाहीतर नागरिकांचं आरोग्य यामुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील गोकुळ बंगल्या जवळ हा धक्कादायक प्रकार घडला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख राजेंद्र सावंत यांनी घाणीच्या पाणीत केळी धुतानाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. संबंधित फळ विक्रेत्याला विचारणा केली असता माझं नुकसान तुम्ही भरून देणार का? असा सवाल करत फळ विक्रेत्याने आपली मुजोरी दाखवल्याचे सांगितले जात आहे.
