Vijay Wadettiwar : हिंदी सक्ती विरोधात काँग्रेसचा हात पुढे, दोन्ही भावांचं निमंत्रण आलं तर.. वडेट्टीवार काय म्हणाले?

Vijay Wadettiwar : हिंदी सक्ती विरोधात काँग्रेसचा हात पुढे, दोन्ही भावांचं निमंत्रण आलं तर.. वडेट्टीवार काय म्हणाले?

| Updated on: Jun 27, 2025 | 3:16 PM

हिंदी भाषा सक्तीविरोधात आणि मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मुंबईत भव्य मोर्च निघणार आहे. या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

हिंदी भाषा सक्तीला आमचा देखील विरोध असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. इतकंच नाहीतर मोर्चासाठी निमंत्रण आल्यास आमची भूमिका ही साकारात्मक असल्याचे म्हणत हिंदी सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधू मैदानात उतरल्यानंतर काँग्रेसने देखील पाठिंबा दर्शवत आपला हात पुढे केला आहे. ‘महाराष्ट्रात हिंदीची सक्ती नको ही भूमिका आम्ही या आधीच मांडली आहे, जर दोन्ही भाऊ एकत्र येऊन या विषयावर मोर्चा काढणार असतील, जर कुठल्याही बॅनर शिवाय मराठीसाठी मोर्चा काढला जाणार असेल आणि दोन्ही भावांचं निमंत्रण आलं तर आम्ही विचार करू आणि त्याबाबत आमची भूमिका सकारात्मक असेल’, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. पुढे वडेट्टीवार असंही म्हणाले की, या निमित्ताने दोन्ही भावांच्या एकत्रिकरणाचं पुढचं पाऊल टाकलं जात असेल तर आमची भूमिका समर्थनातच आहे. कालच मला बाळा नांदगावकर यांचा फोन आला होता आणि त्यांनी मोर्चात सामील होण्याची विनंती केली आहे.

Published on: Jun 27, 2025 03:10 PM