….पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल

….पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल

| Updated on: Jun 09, 2026 | 10:50 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देशाच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत केंद्र सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची तुलना देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळाशी होऊ शकत नाही. “नेहरूंच्या नेतृत्वाखाली देश स्वातंत्र्यानंतर अत्यंत कठीण परिस्थितीतून उभा राहिला. त्या काळात अनेक आव्हानांचा सामना करत देशाच्या विकासाचा पाया रचण्यात आला,” असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना वडेट्टीवार यांनी सध्याच्या परिस्थितीवर टीका करत, “आज देशाकडे सर्व साधनसंपत्ती आणि सुविधा उपलब्ध असतानाही अनेक समस्या कायम आहेत. महागाई, बेरोजगारी आणि विविध प्रश्नांमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे,” असा आरोप केला.

मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळाचा उल्लेख करत त्यांनी मिश्किल शब्दांत टीका केली. “सरकारची 12 वर्षे पूर्ण झाली असली, तरी देशाचेच 12 वाजले आहेत, हे आता जनतेच्या लक्षात आले आहे,” असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले.

दरम्यान, त्यांच्या या टीकेमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 09, 2026 10:50 AM
Follow Us