Vijay Wadettiwar : प्रत्येक कुटुंबाला 10 हजारांची सानुग्रह मदत : विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar : प्रत्येक कुटुंबाला 10 हजारांची सानुग्रह मदत : विजय वडेट्टीवार

| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 3:45 PM

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

अतिवृष्टीमुळे राज्यातील एनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक नागरिकांचे मोठे नुकसान यावेळी झाले. पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानंतर कॅबिनेट मिनिस्टर विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत या मदतीबाबत सविस्तर माहिती दिली.