Mahad Clash : मंत्री गोगावले यांच्या मुलासह इतरांविरोधात 21 कलमांखाली गुन्हे दाखल, प्रकरण नेमकं काय?

Mahad Clash : मंत्री गोगावले यांच्या मुलासह इतरांविरोधात 21 कलमांखाली गुन्हे दाखल, प्रकरण नेमकं काय?

| Updated on: Dec 03, 2025 | 3:47 PM

महाडमधील गोगावले-तटकरे समर्थकांच्या राड्याप्रकरणी विकास गोगावले, महेश गोगावले आणि विजय मालुसरे यांच्यावर 21 विविध कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. यावर बोलताना भारत गोगावले यांनी तटकरेंवर षडयंत्राचा आरोप केला असून, त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरात तणावाचे वातावरण निर्माण केल्याचा दावा केला आहे.

महाड येथील गोगावले आणि तटकरे समर्थकांमध्ये मतदानदिनी झालेल्या राड्याप्रकरणी विकास गोगावले यांच्यासह महेश गोगावले आणि विजय मालुसरे यांच्यावर 21 विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी तटकरे यांच्यावर थेट आरोप केले आहेत.

मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले आहे की, “आम्हाला डॅमेज करण्यासाठी अशा गोष्टी घडवून आणायच्या तटकरेंचा ह्यात हातखंडा आहे.” त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरात वातावरण तंग करण्याचा प्रयत्न केला, तसेच गाड्यांमध्ये हत्यारे, हॉकी स्टिक आणि स्टंप घेऊन आल्याचा आरोपही गोगावले यांनी केला. विरोधी गटाच्या बॉडीगार्डने पिस्तूल बाहेर काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला. या सर्व आरोपांची चौकशी व्हावी अशी मागणी गोगावले यांनी केली आहे. महाडची जनता 21 तारखेला निवडणुकीचा निकाल देईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Dec 03, 2025 03:46 PM