Pandharpur : खाकीला कलंक… पोलीस म्हणावं की काय! वयस्कर व्यक्तीच्या हाताला धरलं अन् फरपटत ओढलं… बघा VIDEO

Pandharpur : खाकीला कलंक… पोलीस म्हणावं की काय! वयस्कर व्यक्तीच्या हाताला धरलं अन् फरपटत ओढलं… बघा VIDEO

| Updated on: Sep 26, 2025 | 4:12 PM

पंढरपूर मंदिर परिसरात एका पोलिसाने हार विकणाऱ्या वयस्कर व्यक्तीला ओढत नेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. व्हिडिओमध्ये पोलिसांकडून झालेल्या कारवाईचे दृश्य दिसत असून, नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पंढरपूरमध्ये पोलिसांकडून एका वयस्कर व्यक्तीला ओढत नेल्याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पंढरपूर येथील प्रसिद्ध मंदिर परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, मंदिर परिसरात हार विक्रीसाठी बसलेल्या एका वयस्कर व्यक्तीवर पोलिसांनी अशा पद्धतीनं कारवाई केल्याचं दिसून येत आहे. व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी त्या वयस्कर व्यक्तीला अक्षरशः ओढत नेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

या घटनेनंतर समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नागरिकांकडून पोलिसांच्या या कृतीवर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, या घटनेतील संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशा प्रकारच्या अमानवी कृतीमुळे पोलिसांच्या प्रतिमेला धक्का लागत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. या व्हायरल व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Published on: Sep 26, 2025 04:12 PM