Maharashtra Elections 2026 Results | मुंबईत भाजपला धक्का, प्रभाग 111 मध्ये सारिका पवार यांचा पराभव
मुंबईच्या प्रभाग क्र. 111 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार दीपक सावंत विजयी झाले असून भाजपच्या सारिका पवार यांचा पराभव झाला आहे. या विजयामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील आणखी एका प्रभागावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मतमोजणीच्या शेवटच्या फेऱ्यांमध्ये दीपक सावंत यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

मुंबईचे संपूर्ण कल आता स्पष्ट झाले असून भाजप–शिवसेना युती एकूण 130 जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये भाजप एकटी 99 जागांवर असून उर्वरित जागांवर शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. या निकालांमुळे मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेचे चित्र जवळपास स्पष्ट होत असून अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील काही तासांत राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Jan 16, 2026 02:49 PM