VIDEO : Pune Breaking | पुण्यात एका महिला राष्ट्रीय खेळाडूला मारहाण

VIDEO : Pune Breaking | पुण्यात एका महिला राष्ट्रीय खेळाडूला मारहाण

| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 1:35 PM

बीएमडब्ल्यू कार चालकाने 23 वर्षीय राष्ट्रीय महिला खेळाडूला मारहाण केल्याप्रकरणी मनसेकडून कारवाईची मागणी केली जात आहे.

बीएमडब्ल्यू कार चालकाने 23 वर्षीय राष्ट्रीय महिला खेळाडूला मारहाण केल्याप्रकरणी मनसेकडून कारवाईची मागणी केली जात आहे. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करा, नाहीतर मनसे त्याला फोडेल अशी प्रतिक्रिया मनसे नेत्या रुपाली पाटील  यांनी दिली आहे. राष्ट्रीय स्तरावर जुडो रेसलिंग खेळणाऱ्या वैष्णवी ठुबेला बांधकाम व्यावसायिक सुमित टिळेकरने हडपसर परिसरात जबर मारहाण केल्याचा आरोप आहे. कार नीट चालवण्यास सांगितल्याचा राग आल्याने सुमित टिळेकरने दुचाकीस्वार वैष्णवीला मारहाण केली.