याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
दोन दिवसांपूर्वीच ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंचा करिश्मा पहायला मिळणार की नाही याचा फैसला काही दिवसांवर आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी पालिकेतील जागांबाबत दावा केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांची युती झाली आहे. राज आणि उद्धव ठाकरे हे बंधू 18 वर्षांनी एकत्र आले आहेत. दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे मुंबईतल्या 67 प्रभागांमध्ये दोन्ही ठाकरेंची ताकद वाढलेली पहायला मिळत असल्याची माहिती समोर आली आहे अशा पत्रकारांच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी 67 च काय याक्षणी आम्ही 115 जागा जिंकत आहोत असे म्हटले. बहुमताला जो आकडा लागतो, तो आम्ही मिळवू महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्याकडून पालिकेत शतक पार होत आहे असेही ते म्हणाले. भाजपाकडून उत्तर प्रदेशातील नेत्यांना प्रचारासाठी आणले जात आहे. यावर संजय राऊत यांनी भाजप बलात्कारी कुलदीप सेंगर यालाही प्रचारासाठी आणू शकतात. राम रहिम, आसाराम सारे बलात्कारी त्यांना प्रिय आहे असा खोचक उत्तर संजय राऊत यांनी दिले आहे.
Published on: Dec 27, 2025 12:07 PM
