Corona विरोधातील लढाई जिंकण्यासाठी सर्वांची साथ हवी : Rajesh Tope

Corona विरोधातील लढाई जिंकण्यासाठी सर्वांची साथ हवी : Rajesh Tope

| Updated on: Jul 04, 2021 | 9:35 PM

युरोपमध्ये पण तिसरी लाट आली आहे पण व्हॅक्सीनमुळे त्याची तीव्रता कमी आहे. म्हणून आमचा आग्रह आहे की लसीकरणावर बारकाईने लक्ष देऊया. कोरोनाची ही लढाई जिंकायची आहे त्यासाठी सर्वांची साथ हवी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. (We needs support to win the battle against Corona, Rajesh Tope appeal)

मुंबई : काल एका दिवसात 8 लाख 11 हजार व्हॅक्सिन देण्यात आले. साडे अठ्ठावन लाख लोक बरे झाले. त्यांना साथ देण्याचं काम पोलीस कर्मचारी, हॉस्पिटल स्टाफने केले आहे. कोरोनाचे संकट हे माणुसकीची परीक्षा आहे. आम्ही कोणतेही आकडे लपवले नाही जे प्रोटोकॉल होते ते आम्ही पाळले. अवास्तव हॉस्पिटल बिलांवर आम्ही निर्बंध आणले. अॅम्ब्युलन्स फ्री मिळाली पाहिजे. सगळे खर्च थांबवून आपल्याला कोरोनावर लक्ष द्यायचं आहे. आम्ही रिकामी असलेली पदे भरली. सर्व पायाभूत सुविधा उभारत आहोत. लोकांना चांगली आरोग्य सेवा घरापर्यंत काशी मिळेल त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. युरोपमध्ये पण तिसरी लाट आली आहे पण व्हॅक्सीनमुळे त्याची तीव्रता कमी आहे. म्हणून आमचा आग्रह आहे की लसीकरणावर बारकाईने लक्ष देऊया. कोरोनाची ही लढाई जिंकायची आहे त्यासाठी सर्वांची साथ हवी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. कोरोना काळातील देवदुतांचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन संकल्प संस्था आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात आपल्या भाषणादरम्यान टोपे यांनी आवाहन केले.