Special Report | पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊतांच पुढं काय काय होणार?

| Updated on: Aug 01, 2022 | 10:42 PM

चौकशीसाठी संजय राऊत यांना चार वेळा समन्स बजावण्यात आलं. पण ते यांपैकी फक्त एकदाच ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले. याकाळात त्यांनी महत्वाचे साक्षीदार आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. प्रवीण राऊतांच्या कंपनीनं 37 लाख दादरच्या घरासाठी दिले. संजय राऊतांच्या परदेश दौऱ्यासाठीही प्रवीण राऊतांनीच पैसे दिले.

Follow us on

मुंबई : अटकेनंतर अखेर 4 ऑगस्टपर्यंत संजय राऊतांना(Sanjay Raut) कोठडी सुनावण्यात आलीय. म्हणजेच 4 ऑगस्टपर्यंत राऊत ईडीच्या कोठडीत असतील. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात, संजय राऊतांना थेट फायदा झाल्याचा आरोप ईडीनं केलाय. ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी जोरदार युक्तीवाद केला. प्रवीण राऊत फक्त फ्रंटमॅन, घोटाळा संजय राऊतांनी केला. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत नावाला होते, सर्व व्यवहार संजय राऊतांनीच केले. गुरु आशिष कन्ट्रक्शनचे माजी संचालक प्रवीण राऊतांनी एक रुपयांचीही गुंतवणूक केली नाही. पण त्यांना 112 कोटी मिळाले आणि प्रवीण राऊतांच्या कंपनीकडून 1 कोटी 6 लाख संजय राऊत आणि वर्षा राऊतांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. 2010-11 मध्ये राऊत दर महिन्याला 2 लाख प्रवीण राऊतांकडून घ्यायचे. संजय राऊतांनी याच पैशातून अलिबागमध्ये भूखंड खरेदी केला. हा भूखंड स्वप्ना पाटकर यांच्या नावे घेण्यात आला, असं चौकशीतून समोर आलं आहे.

चौकशीसाठी संजय राऊत यांना चार वेळा समन्स बजावण्यात आलं. पण ते यांपैकी फक्त एकदाच ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले. याकाळात त्यांनी महत्वाचे साक्षीदार आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. प्रवीण राऊतांच्या कंपनीनं 37 लाख दादरच्या घरासाठी दिले. संजय राऊतांच्या परदेश दौऱ्यासाठीही प्रवीण राऊतांनीच पैसे दिले. त्यामुळं आणखी तपासासाठी आम्हाला 8 दिवसांची पोलीस कोठडी हवी ईडीच्या वकिलांनी संजय राऊतांची 8 दिवसांची कोठडी मागितली. मग संजय राऊतांचे वकील अशोक मुंदरगी यांनी राऊतांवरील कारवाईला राजकीयदृष्टीने प्रेरित असल्याचं म्हटलंय.

संजय राऊतांची अटक राजकीय हेतूनं आहे. महाराष्ट्रात राजकीय वातावरण बदललंय, त्यामुळं हे सुरु झालंय. मला काही माहितीच नसेल आणि त्याचं उत्तर नाही दिलं तर तो काही गुन्हा होऊ शकत नाही. वर्षा राऊत यांना जे पैसे मिळाले ते पैसे थेट खात्यात घेण्यात आले. जर गैरव्यवहाराचे पैसे घेतले असते तर ते बँक खात्याने घेतले असते का? घर घेतले असेल किंवा जमिन घेतली असेल सर्व पैसे कायदेशीर रित्या चुकते केले. ते पैसे कायदेशीर मार्गाने कमावलेले होते.  स्वप्ना पाटकर या महिलेशी काही कारणानं वाद झाले होते. तोच धागा पकडत आता कारवाई करण्यात आलीय. संजय राऊतांना हृदयासंदर्भात आजार आहे, त्यांच्यावर यासंबंधी शस्त्रक्रिया देखील झालेली आहे.

संजय राऊत यांना कोठडी द्यायची असेल तर कमीत कमी दिवसांसाठी त्यांना कोठडी देण्यात यावी. रविवारी सकाळीच ईडीचे अधिकारी राऊतांच्या भांडुपमधल्या घरी आले..इथं 10 तास चौकशी केली…त्यानंतर दुपारी ईडीच्या कार्यालयात आल्यानंतर रात्री साडे बारा वाजता ईडीनं अटक केल्याचं घोषित केलं. त्यानंतर कोर्टात हजर करण्याआधी ईडीनं राऊतांना जेजे रुग्णालयात आणलं. पण ईडी कार्यालयातून निघाल्यावरही राऊत दोन्ही हात उंचावतच आले पत्राचाळ घोटाळा प्रकरणात राऊतांनी आरोप फेटाळलेत. मात्र झुकणार नाही आणि शिवसेना सोडणार नाही हेही राऊत म्हणालेत  कोर्टातल्या युक्तीवादात स्वप्ना पाटकरचाही विषय निघाला. शिवीगाळ केल्याच्या स्वप्ना पाटकरांच्या तक्रारीनंतर राऊतांवर गुन्हाही दाखल झाला. ती कथित ऑडिओ क्लीप व्हायरलही झाली. त्यात शिवीगाळ असून सुजितच्या नावानं किंवा माझ्या नावानं जमिनीचे कागदपत्र ट्रान्सफर करण्याची मागणी होतेय..ईडीच्या जबाबात याआधी स्वप्ना पाटकरनं माझ्या नावावर संपत्ती खरेदी झाल्याचं सांगितलंय. आता 4 ऑगस्टपर्यंत ईडीला राऊतांची कोठडी मिळालीय…त्यामुळं ईडीच्या हाती आणखी काय काय लागते ?, हेही समोर येईलच.