Eknath Shinde : शिंदेंच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी? भाजपची पुढची रणनीती काय? अपक्ष आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी?

| Updated on: Jul 06, 2022 | 12:07 PM

पुन्हा एकदा भाजप आल्यामुळे भाजप आणि इतर मित्रपक्षांचे आमदारही सरकारकडे अपेक्षेने पाहत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या दृष्टीकोनातून भाजपदेखील अत्यंत सावधगिरीने खातेवाटप करत आहे. या खातेवाटपात परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Follow us on

मुंबईः  राज्यात सध्या खातेवाटपासंदर्भात चर्चा सुरू झालीय. महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) धक्का देत महाराष्ट्रात शिवसेनेतील शिंदे गट आणि भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले आहे. आता मंत्रिपदाकडे डोळे लावून बसले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत बहुमत चाचणी घेत विश्वासमत ठरावही जिंकला आहे. आता शिंदे यांचं मंत्रीमंडळ लवकरच जाहीर होईल. शिवसेनेतून (Shivsena) एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंड झाल्यानंतर मंत्रिपद कुणाला मिलतं, याकडे लक्ष आहे. तर सत्तेत पुन्हा एकदा भाजप आल्यामुळे भाजप आणि इतर मित्रपक्षांचे आमदारही सरकारकडे अपेक्षेने पाहत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या दृष्टीकोनातून भाजपदेखील अत्यंत सावधगिरीने खातेवाटप करत आहे. या खातेवाटपात परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.