Chhagan Bhujbal On Sunetra Pawar | उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राज्याला नवा उपमुख्यमंत्री कोण मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हालचालींना वेग आला असून, उद्या मुंबईत पक्षाच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राज्याला नवा उपमुख्यमंत्री कोण मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हालचालींना वेग आला असून, उद्या मुंबईत पक्षाच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावले आहे. या बैठकीत नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता असून, सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. उद्याच्या बैठकीत जर उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय झाला, तर त्याच दिवशी नव्या उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. उद्याची बैठक राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
