4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 7 July 2021

| Updated on: Jul 07, 2021 | 11:39 AM

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी. दिलीपकुमार यांच्या जाण्यानं फक्त बॉलीवूडच नाही तर जगभरातल्या त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरलीय. एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त केली जातेय.

Follow us on

अभिनयाचं विद्यापीठ, ट्रॅजेडी किंग म्हणून ओळख असणारे आणि अनेक पिढ्यांवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी दिलीप कुमारांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान मोदींपासून ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार असे सारेच दिलीप कुमारांच्या आठवणीत भावुक झाले. सांस्कुतीक विश्वाचं मोठं नुकसान झालं असं मोदी म्हणाले. तर भारताने आपला महानायक गमावला या शब्दात पवारांनी दिलीप यांना श्रद्धांजली वाहितली. भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा रुपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला…, अशा भावना मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.