Raj Thackeray : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे बोलणार?
शिंदे गटाच्या मेळाव्यात राज ठाकरे प्रमुख पाहुणे असतील. शिवाजी पार्कात राज ठाकरेही बोलणार. शुक्रवारी एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले होते.
मुंबई : शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटानं अर्ज दाखल केलाय. आधीच ठाकरे गटानं शिवसेनेच्या मेळाव्यासाठी शिवाजी पार्क हवा, असा अर्ज केलाय. त्यामुळं ठाकरे की, शिंदे गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळणार, असा प्रश्न निर्माण झालाय. दसरा मेळाव्यावरून राज्याच्या राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. शिवसेनेपाठोपाठ शिंदे गटानं दादरच्या शिवाजी पार्कात मेळावा घेण्यासाठी अर्ज केला. शिंदे गटाच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या मेळाव्यात राज ठाकरे प्रमुख पाहुणे असतील. शिवाजी पार्कात राज ठाकरेही बोलणार. शुक्रवारी एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले होते.
Published on: Sep 02, 2022 08:57 PM
