Special Report | भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यातील मतभेद मिटणार का?

| Updated on: Aug 14, 2022 | 12:02 AM

भावना गवळी आणि संजय राठोड दोघेही शिवसेनेचेच खासदार आणि आमदार.आता हे दोघेही शिंदे गटात आलेत. मात्र दोघांमधले मतभेद जगजाहीर आहेत.राठोड आणि भावना गवळींमध्ये मतदारसंघात वर्चस्वाची लढाई आतापर्यंत पाहायला मिळालीय..आता दोघेही शिंदे गटात आल्यानं राजकीय वाद मिटतो का ?,हेही पाहावं लागेल.

Follow us on

मुंबई :  वर्षभरानंतर मतदार संघात येताच, शिवसेनेच्या महिला आघाडीनं अशाप्रकारे खासदार भावना गवळींच्या विरोधात आंदोलन केलं. तर संजय राठोडांच्या स्वागताचंही पोस्टर फाडण्यात आलं. विरोधकांनीच पोस्टर फाडल्याचा आरोप राठोडांच्या कार्यकर्त्यांकडून झालेत.

वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी वर्षभरानंतर यवतमाळमध्ये आल्या. यवतमाळची जनता भावना गवळींची वाट पाहत होतीच. पण गवळी शिंदे गटात गेल्यानं शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांचा रोष दिसला. किरकोळ विरोध झाला असला तरी भावना गवळी आणि संजय राठोडांच कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं.

मंत्री होऊन परतलेल्या राठोडांनी तर शक्तिप्रदर्शनच केलं. राठोडांवर थेट जेसीबीनं फुलांची उधळण करण्यात आली. कुटुंबीयांसह संजय राठोडांची जोरदार रॅलीही निघाली. राठोडांच्या या शक्तिप्रदर्शनात त्यांची मुलगी दामिनी राठोडही सहभागी झाल्या. त्यामुळं राठोडांच्या राजकीय वारसदार म्हणून दामिनी राठोडांना राजकीय मैदानात उतरवणार का ? अशा चर्चाही सुरु झाल्या..

महाविकास आघाडी सरकारमध्ये तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात राठोडांचं मंत्रिपद गेलं. मात्र दीड वर्षांनंतर राठोडांना शिंदे गटात आल्यानं मंत्रिपदाची लॉटरी लागली..त्यामुळं यवतमाळमध्ये राठोडांचं भव्य स्वागत झालं. भावना गवळी आणि संजय राठोड दोघेही शिवसेनेचेच खासदार आणि आमदार.आता हे दोघेही शिंदे गटात आलेत..

मात्र दोघांमधले मतभेद जगजाहीर आहेत. तर भावना गवळींसोबत मतभेद आहेत मनभेद नाही, अशी प्रतिक्रिया राठोडांनी दिलीय. राठोड आणि भावना गवळींमध्ये मतदारसंघात वर्चस्वाची लढाई आतापर्यंत पाहायला मिळालीय..आता दोघेही शिंदे गटात आल्यानं राजकीय वाद मिटतो का ?,हेही पाहावं लागेल..