Palkhi Sohala : धक्कादायक! पुण्यातील पालखी मुक्कामात वारकऱ्यांसोबत अघटित घडलं
Pune News : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात मुक्कामी असताना याठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
अजिंक्य धायगुडे, प्रतिनिधी.
पुण्यामध्ये वारकऱ्यांच्या अंगावर मांसाचा तुकडा फेकल्याचा आरोप करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात मुक्कामी असतानाचा हा प्रकार आहे. याचवेळी संबंधित महिलेवर पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी ज्यावेळी पुण्यात मुक्कामास होत्या त्यावेळी कॅम्प परिसरात हा सर्व प्रकार घडला आहे. एका महिलेने वारकऱ्यांच्या अंगावर मांसाचा तुकडा फेकल्याचा आरोप वारकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यानंतर तातडीने लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र सदरची महिला आजारी असून रुग्णालयात आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदरचा मांसाचा तुकडा हा पाळलेल्या मांजरीला या महिलेने टाकला होता. मात्र तो चुकून वारकऱ्यांच्या अंगावर पडला, असं या महिलेचं म्हणण आहे.
