Yavatmal Crime News : प्रेमविवाहाचा ‘अतिरेकी’ शेवट, मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यांच्या मदतीने पतीचा काटा काढला

Yavatmal Crime News : प्रेमविवाहाचा ‘अतिरेकी’ शेवट, मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्यांच्या मदतीने पतीचा काटा काढला

| Updated on: May 21, 2025 | 7:00 PM

Headmistress kills husband : मुख्याध्यापिकेने तिच्या शिक्षक पतीला विष देऊन मारत त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मदतीने पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमधून समोर आला आहे.

पुण्यातल्या वैष्णवी हगवणेचं प्रेमविवाहातून झालेल्या मृत्यूचं प्रकरण ताजं असतानाच यवतमाळमधून अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुख्याध्यापिकेने तिच्या शिक्षक पतीला विष देऊन मारल्याचं हत्याकांड यवतमाळ जिल्ह्यात उघड झालं आहे. विशेष म्हणजे पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मुख्यध्यापिकेने तीन विद्यार्थ्यांची मदत घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शंतनू अरविंद देशमुख (32, रा. सुयोगनगर) असं मृत पतीचं नाव आहे. तर निधी शंतनू देशमुख असं आरोपी पत्नीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख दाम्पत्याचा प्रेमविवाह होता. मात्र या दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे. 13-14 मेच्या मध्यरात्रीच्या सुमारास यवतमाळ शहरालगतच्या चौसाळा जंगलात 15 मे रोजी जळालेल्या अवस्थेत शंतनूचा मृतदेह आढळला. निधीने आपल्या पतीला विष देऊन आधी जीव घेतला. त्यानंतर तिने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चौसाळा येथील टेकडीवरती टाकला. त्यानंतर तिने आपल्या विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी मृतदेह पेटवून दिला. पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करत या प्रकरणाचा उलगडा केला आहे.

Published on: May 21, 2025 07:00 PM