Yavatmal | यवतमाळमध्ये हेलिकॉप्टरचा फॅन लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Yavatmal | यवतमाळमध्ये हेलिकॉप्टरचा फॅन लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

| Edited By: | Updated on: Aug 11, 2021 | 3:36 PM

घरीच बनवलेल्या हेलिकॉप्टरची ट्रायल  (Helicopter trial) घेताना, फॅन तुटून झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. महागाव (Mahagaon) तालुक्यातील फुलसावंगी इथे ही धक्कादायक घटना घडली.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील शेख इस्माईल ऊर्फ मुन्ना शेख इब्राहिम या तरुणाने  घरीच एक हेलिकॉप्टर बनवलं. पण त्याची ट्रायल घेताना फॅन तुटून झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या  धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.