Pune : मुलींच्या शरीरावरून कमेंट्स, काढली लायकी; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण, पोलिसांसमोरच ठिय्या

Pune : मुलींच्या शरीरावरून कमेंट्स, काढली लायकी; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण, पोलिसांसमोरच ठिय्या

| Updated on: Jul 15, 2025 | 3:34 PM

पुण्याच्या तालमीतील पैलवानांनी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. यासोबतच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलींसोबत छेडछाड केल्याचाही आरोप केला जात आहे. बघा व्हिडीओ

पुण्यातील तळजाई टेकडी परिसरात पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या काही मुला-मुलींना तालमीतील पैलवानांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार सकाळी नेहमीप्रमाणे काही विद्यार्थी पोलीस भरतीचा सराव करत असताना १० ते १२ जणांच्या एका टोळक्याने त्यांना अडवले आणि मारहाण केली. यात मुलींचाही समावेश होता. या मारहाणीच्या वेळी, “तुमची लायकी नाही पोलीस होण्याची” अशा अपमानास्पद शब्दांत मुलींना हिणवण्यात आले. तर काही जणांनी मुलींची छेड काढली आणि त्यांच्या शरीरावरून कमेंट्स केल्याचेही आरोप होत आहे.

या घटनेनंतर संबंधित विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक थेट सहकारनगर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती देत, संबंधित गुंडगिरी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. सुरुवातीला गुन्हा दाखल करून घेतला जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला, त्यामुळे त्यांनी पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन केलंय.

Published on: Jul 15, 2025 03:34 PM