पतंजलीची फूड सेफ्टी ट्रिब्यूनलमध्ये धाव, कोर्टाने दिले होते आदेश, काय आहे प्रकरण ?
पतंजली गायीच्या तुपाशी संबंधित मीडिया रिपोर्ट्स आणि 20 ऑक्टोबर 2020 रोजी अन्न सुरक्षा विभाग, पिथोरागडने अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत दाखल केलेल्या खटल्याचा हवाला देत, न्यायालयाचा आदेश "चुकीचा आणि बेकायदेशीर" असल्याते पतंजलीने म्हटले होते.
योग गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीने गाईचे तूप निकृष्ट असल्याच्या वृत्तांवर स्पष्टीकरण जारी केले आहे. क्वॉलिटी स्टँडर्ड सुनिश्चित करण्यासाठी कठोर चाचणी केल्यानंतरच (कंपनीद्वार) गाईचे दूध आणि तूप विकले जाते, असे कंपनीने स्पष्ट केलं. पतंजली गायीच्या तुपाशी संबंधित मीडिया रिपोर्ट्स आणि 20 ऑक्टोबर 2020 रोजी अन्न सुरक्षा विभाग, पिथोरागडने अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत दाखल केलेल्या खटल्याचा हवाला देत, पतंजलीने त्यानंतरचा न्यायालयाचा आदेश हा “चुकीचा आणि बेकायदेशीर” असल्याचे म्हटले होते. रेफरल प्रयोगशाळेला गायीच्या तुपाच्या चाचणीसाठी NABL मान्यता नव्हती. त्यामुळे, तिथे केलेली चाचणी कायदेशीररित्या स्वीकार्य नाही असा युक्तिवाद करण्यात आला. एका निकृष्ट दर्जाच्या प्रयोगशाळेने पतंजलीच्या उच्च दर्जाच्या गायीच्या तूपाला निकृष्ट दर्जाचे घोषित करणे हे अतिशय हास्यास्पद आणि अत्यंत आक्षेपार्ह असल्याचेही कंपनीने एका निवेदनात म्हटले होते.
फूड सेफ्टी ट्रिब्यूनलमध्ये करणार अपील
ज्या मानकांच्या आधारे नमुना अयशस्वी झाला ते मानक त्यावेळी लागू नव्हते, म्हणून त्यांचा वापर कायदेशीररित्या चुकीचा होता असा युक्तिवाद पतंजलीने पुढे केला. कंपनीने नमुन्याची रीटेस्टिंग (पुनर्चाचणी) करण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले . तसेच असाही दावा केला की, जेव्हा उत्पादनाची चाचणी घेण्यात आली तेव्हा ते कालबाह्य झाले होते.
न्यायालयाने या प्रमुख युक्तिवादांचा विचार न करता प्रतिकूल आदेश दिला, जो कायदेशीरदृष्ट्या न्याय्य नसल्याचे कंपनीने नमूद केलं. या आदेशाविरुद्ध फूड सेफ्टी ट्रिब्यूनलमध्ये अपील दाखल करण्यात येणार आहे. आम्हाला खात्री आहे की आमच्या बाजूने न्यायाधिकरण आमच्या बाजूने निकाल देईल,असा विश्वासही कंपनीने व्यक्त केला.
तूप हानिकारक असल्याचे कोर्टाने म्हटले होते
याशिवाय, कंपनीने असेही म्हटले आहे की ऑर्डरमध्ये कुठेही असे म्हटले नाही की पतंजली गायीचे तूप सेवनासाठी हानिकारक आहे. मानकांपेक्षा तुपाच्या आरएम व्हॅल्यूमध्ये फक्त किरकोळ फरकाचा उल्लेख आहे असा उल्लेख कंपनीने केला. आरएम व्ह्रल्यू हे तुपामधील अस्थिर फॅटी आम्लांचे प्रमाण दर्शवते (जे तूप गरम केल्यावर अस्थिर होतात). ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्याचा तुपाच्या गुणवत्तेवर फरक पडत नाही. ज्याप्रमाणे मानवी शरीरात हिमोग्लोबिनमध्ये किरकोळ बदल होणे नैसर्गिक आहे, तसेच हे आहे, असे नमूद करण्यात आले होते.