एकमेकांपासून 50 फूट अंतरावर दोन मध्यमवयीन पुरुषांचे मृतदेह, सांगलीत खळबळ

सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील मांजर्डे गावाच्या हद्दीत हातनूर रोडला दोघांचे मृतदेह सापडले. एकमेकांपासून 50 फूट अंतरावर मृतदेह आढळले असून दोघांचीही ओळख पटली आहे

एकमेकांपासून 50 फूट अंतरावर दोन मध्यमवयीन पुरुषांचे मृतदेह, सांगलीत खळबळ
सांगलीत दोन पुरुषांचे मृतदेह आढळले

सांगली : सांगलीत एकाच वेळी दोन मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. एकमेकांपासून 50 फूट अंतरावर दोन पुरुषांचे मृतदेह सापडले. दोघांच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट असलं तरी हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. (Sangli two men found dead 50 feet away from each other)

हत्येचा प्राथमिक अंदाज

सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील मांजर्डे गावाच्या हद्दीत हातनूर रोडला दोघांचे मृतदेह सापडले. एकमेकांपासून 50 फूट अंतरावर मृतदेह आढळले आहेत. घटनास्थळी डीवायएसपी अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक संजय झाडे आणि पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत. खुनाचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

दोघांची ओळख पटली

दोघा मृतदेहांची ओळख पटली असून एकाचे नाव तानाजी शिवराम शिंदे (वय 65 राहणार आरवडे) तर दुसऱ्याचे नाव अजित बाबुराव साळूखे (वय 50 राहणार माजर्डे) आहे. दोघांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत.

फुरसुंगी कॅनॉलमध्ये पुरुषाचा मृतदेह

याआधी, पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या फुरसुंगी गावात कॅनॉलमध्ये मे महिन्यात दोन मृतदेह सापडले होते. फुरसुंगी येथे कॅनॉलमध्ये एका पुरुषाचा मृतदेह वाहून आल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

महिलेचाही मृतदेह वाहत येताना दिसला

अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिकांनी पुरुषाचा मृतदेह बाहेर काढला. त्याचवेळी एका महिलेचाही मृतदेह वाहत येत असल्याचे जवानांना दिसले. त्यांनंतर जवानांनी महिलेचा मृतदेहही कॅनॉलमधून बाहेर काढला. दोन्ही मृतदेह लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

संबंधित बातम्या :

पुण्यात पुलाखाली मध्यमवयीन महिलेचा मृतदेह सापडला, ओळख पटवण्याचं आव्हान

फुरसुंगीत कॅनॉलमध्ये पुरुष मृतावस्थेत सापडला, इतक्यात महिलेचाही मृतदेह वाहत आला, पुण्यात खळबळ

(Sangli two men found dead 50 feet away from each other)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI