AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shilpa Shinde : जे उखडायचं ते उखडा… शिल्पा शिंदेचा रौद्रावतार; ट्रोलर्सवर भडकली

Shilpa Shinde सध्या एका नव्या वादामुळे चर्चेत आली आहे. एका निर्मात्यावर लैंगिक शोषणाचा खोटा आरोप केल्याची कबुली दिल्यानंतर तिच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Shilpa Shinde : जे उखडायचं ते उखडा... शिल्पा शिंदेचा रौद्रावतार; ट्रोलर्सवर भडकली
shilpa shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 06, 2026 | 6:12 PM
Share

भाबीजी घर पर है या सीरिअलमधील अंगूरी भाभी अर्थात शिल्पा शिंदे सध्या एका मोठ्या वादात सापडली आहे. एका निर्मात्यावर लैंगिक शोषणाचा खोटा आरोप केल्याचं तिने एका मुलाखतीत कबूल केलं आहे. त्यामुळे ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने तिच्या या खुलाश्याची गंभीर दखल घेऊन तिला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनचे पदाधिकारी एवढ्यावर थांबलेले नाहीत तर या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जाहीर विनंती केली आहे. शिल्पा शिंदेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. त्यामुळे शिल्पाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ट्रोलर्सने तिला बेजार केलं असून त्यांच्यावरही तिने आपला सर्व राग काढला आहे.

चारही बाजूने कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता बळावली तरी शिल्पाचा तोरा काही कमी झालेला नाही. तिने सोशल मीडियावर अत्यंत आक्रमक पोस्ट केली आहे. ज्यांना जे उखडायचं ते उखडा. मला काही फरक पडत नाही, असं म्हणत तिने खुलं आव्हानच दिलं आहे. तसेच ट्रोलर्सचाही तिने अत्यंत कडक शब्दात समाचार घेतला आहे.

शिल्पाची पोस्ट व्हायरल

चारही बाजूने कोंडी होऊन सुद्धा शिल्पामध्ये काहीच फरक पडलेला नाही. तिने कोणत्याही प्रकारची शरणागती पत्करलेली नाही. उलट तिने आज इन्स्टावर एक रिल आणि काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने स्वत:चा बचाव करताना अत्यंत आक्रमकपणे पोस्ट लिहिली आहे. एक महिला बना आणि नेहमी जे उखडायचं ते उखडा, म्हणण्यासाठी तयार राहा, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमधून तिने तिच्या विरोधकांचाही समाचार घेतला आहे. जळणाऱ्यांनी जळत राहावं. तुमचं रक्त एखाद्या गरजूंना देऊ नका. ते जाळूनच खतम करा, असा हल्लाच तिने चढवला आहे.

त्यावरही बोलली

या पोस्टनंतर शिल्पाने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. तुमचं पीआरचं काम करत राहा. पण या प्रकरणाबाबत खोटी माहिती पसरवणं थांबवा. लैंगिक शोषणाचा अर्थ म्हणजे कोणीही कुणाशी इच्छा नसताना लैंगिक संबंध ठेवणं, त्यामुळे समोरची व्यक्ती असहज होते. घाबरते, तिला अपमानित झाल्यासारखं वाटतं आणि वाईट वाटतं. मर्जीशिवाय शारीरिक संपर्क, लैंगिक भाष्य आणि मस्करी, चुकीचे मेसेज किंवा फोटो वा वारंवार इच्छा नसताना केलेले प्रयत्न आणि लैंगिक भावना जागरूक करणारे इशारे… त्यामुळेच मनाचं काहीबाही पसरवणं बंद करा. ग्राहकांनो जागे व्हा… असं तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

असोसिएशनची चिंता

दुसरीकडे ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने या प्रकरणी अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. भाबीजी घर पर हैचे निर्माते संजय कोहली यांच्यावर प्रसिद्धीसाठी किंवा वाद वाढवण्यासाठी लैंगिक शोषणाचा खोटा आरोप करणं संपूर्ण बॉलिवूड आमि टीव्ही इंडस्ट्रीसाठी अत्यंत चिंताजनक आहे, असं असोसिएशनने म्हटलं आहे. री में यह कदम उठाया था.

Follow Us
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या याचिकेवर सुनावणी सुरु;
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या याचिकेवर सुनावणी सुरु; कोर्टात...
निसर्गाने उधळली सौंदर्याची मुक्त उधळण! साताऱ्याचे धबधबे ओसंडून वाहू...
निसर्गाने उधळली सौंदर्याची मुक्त उधळण! साताऱ्याचे धबधबे ओसंडून वाहू लागले
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं...
NCP | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं...
उद्यापासून संसदेत घमासान? केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
उद्यापासून संसदेत घमासान? केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट, पोलीस बंदोबस्त...
Mumbai | ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट, पोलीस बंदोबस्त...
कागदावर केवळ 100 टक्के नालेसफाई; KDMCची मोठी पोलखोल
KDMC | कागदावर केवळ 100 टक्के नालेसफाई; KDMCची मोठी पोलखोल
दिल्लीत राजकीय घडमोडींना वेग! सर्वपक्षीय बैठकीत मोठा गोंधळ, TMC पक्ष..
दिल्लीत राजकीय घडमोडींना वेग! सर्वपक्षीय बैठकीत मोठा गोंधळ, TMC च्या फुटीर खासदारांना...
शाळेतील मुख्यध्यापिका कॅबिनमध्येच झोपलेल्या अन् मद्यधुंद पतीची थेट..
शाळेतील मुख्यध्यापिका कॅबिनमध्येच झोपलेल्या अन् तिचा मद्यधुंद पती... व्हिडीओच आला समोर
राम मंदिरातील दानाचा हिशोब जाहीर करा... राहुल-खर्गेंची मोठी मागणी
Ram Mandir | राम मंदिरातील दानाचा हिशोब जाहीर करा... राहुल-खर्गेंची पंतप्रधान मोदींना मोठी मागणी
पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली! राष्ट्रवादी नेत्याकडून महाजनांना...
पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली! राष्ट्रवादी नेत्याकडून गिरिश महाजनांना निमंत्रण
एक कुत्रं मुंबईत “निलेशचंद्र” या नावाने मोकाट… ठाकरेंच्या शिलेदाराचा जोरदार हल्लाबोल; ट्विटवरील फोटोने खळबळ.

एक कुत्रं मुंबईत “निलेशचंद्र” या नावाने मोकाट… ठाकरेंच्या शिलेदाराचा जोरदार हल्लाबोल; ट्विटवरील फोटोने खळबळ

ट्रम्प सरकारचा घातक निर्णय, पुन्हा १८ हजार बेकायदा भारतीयांची होणार हकालपट्टी.

ट्रम्प सरकारचा घातक निर्णय, पुन्हा १८ हजार बेकायदा भारतीयांची होणार हकालपट्टी

Monsoon update : मोठं संकट, पावसामुळे हाहाकार उडणार, इस्त्रोच्या फोटोंमुळे आयएमडीची झोप उडाली, महाराष्ट्राला मोठा इशारा.

Monsoon update : मोठं संकट, पावसामुळे हाहाकार उडणार, इस्त्रोच्या फोटोंमुळे आयएमडीची झोप उडाली, महाराष्ट्राला मोठा इशारा

IND vs ENG: वादाच्या चर्चा रंगल्या असातना गौतम गंभीर आणि विराट कोहली एकत्र, लंडनमध्ये  नेमकं काय घडलं?.

IND vs ENG: वादाच्या चर्चा रंगल्या असातना गौतम गंभीर आणि विराट कोहली एकत्र, लंडनमध्ये नेमकं काय घडलं?

भारतासह जगभरात फेसबुक ठप्प, अचानक अकाऊंट गायब; जगभरात मोठी खळबळ.

भारतासह जगभरात फेसबुक ठप्प, अचानक अकाऊंट गायब; जगभरात मोठी खळबळ

हे अजिबात सोपं नाही..; ‘रामायणम्’मधील हनुमानाच्या भूमिकेबद्दल सनी देओल स्पष्टच बोलला...

हे अजिबात सोपं नाही..; ‘रामायणम्’मधील हनुमानाच्या भूमिकेबद्दल सनी देओल स्पष्टच बोलला..