AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्याने मला माणसाचा जन्म दिला…’ नाना पाटेकर कधीच देवळात का जात नाहीत? आहे मोठं कारण

अभिनेते नाना पाटेकर हे नेहमी त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. पण त्यांचं एक वाक्य जे फार चर्चेचा विषय आहे. ते म्हणजे ते देवळात जात नाही याचं कारण. त्यांनी याचं कारण बऱ्याच मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. नाना पाटेकर कधीही मंदिरात आवर्जून जात नाहीत यामागे मोठं कारण आहे.

Updated on: Jul 03, 2025 | 1:15 PM
Share
प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर ज्यांनी हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटसृष्टीत आपलं नाव कमावलं आहे. तसेच त्यांच्या अभिनयानेच नाही तर त्यांच्या हटके शैलीमुळे देखील ते लोकांच्या पसंतीस उतरतात. त्यांची हटके स्टाईल आणि स्पष्ट बोलणारा स्वभाव लोकांना भावतो. गंभीर अभिनयापासून ते कॉमेडीपर्यंत सर्व प्रकराच्या भूमिका त्यांनी केल्या आहेत.

1 / 5
नाना पाटेकर यांनी 'अग्निसाक्षी' आणि 'क्रांतीवीर' सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यांना त्यांच्या अनेक भूमिकांसाठी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. सोबतच मराठी सिनेसृष्टीतील त्यांच काम त्या तोडीच आहे. एवढं नाही तर नाना नाम फाउंडेशनशी जोडलेले आहेत.

2 / 5
नानांबद्दल तसं सर्वांना माहित आहे. त्यांचा स्पष्ट स्वभावही सर्वांना माहित आहे. त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या व्यैयक्तिक आयुष्याबद्दल देखील नेहमीच स्पष्टपणे बोलले आहेत.  त्यांचं एक वक्तव्य चर्चेत आहे  ते नेहमी म्हणतात की, आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं. नानांबद्दल अजून एक जी की फार कोणाला माहित नसेल ते म्हणजे, नाना कधीच देवळात जात नाहीत. होय नाना कधीच देवळात जात नाही. असं का? याबद्दल नानांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितलंय.

3 / 5
नुकत्याच एका कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी देवळात न जाण्याचं कारण सांगितलं.  ते म्हणाले, "मी जाणीवपूर्वक देवळात जात नाही, पण याचा अर्थ मी देवाला मानत नाही असा नाही. त्याने मला माणसाचा जन्म दिलाय हेच खूप आहे, वारंवार तिथे जाऊन त्याला कशाला त्रास द्यायचा? आठ आणे टाकून लाख रुपये दे असं म्हणायचं... नाही, कशाला पाहिजे! माणूस म्हणून जन्माला घातलं तो जन्म पूर्ण सार्थकी लागेल असं जगायचं आणि एक दिवस मरून जायचं. कोण अमरपट्टा घेऊन आलं आहे का?" असं म्हणत त्यांनी त्यांचे मत व्यक्त केलं आहे.

4 / 5
 नाना पाटेकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, ते 'हाऊसफुल 5' मध्ये दिसले.  चित्रपटातील त्यांच्या कामाचं खूप कौतुकही झालं. यापूर्वी ते 'वनवास' सिनेमात उत्कर्ष शर्मासोबत दिसले होते, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या आगामी 'SSMB29' सिनेमात नाना पाटेकर दिसणार असल्याची चर्चा होती, पण त्यांनी या सिनेमातून माघार घेतल्याचं बोललं जात आहे.

5 / 5
बदनापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस; शेतांना आलं तळ्याचे स्वरूप
बदनापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस; शेतांना आलं तळ्याचे स्वरूप.
मुलीला गलिच्छ शिव्या, आव्हाडांच्या पत्नीनं सांगितलं संपूर्ण प्रकरण
मुलीला गलिच्छ शिव्या, आव्हाडांच्या पत्नीनं सांगितलं संपूर्ण प्रकरण.
आव्हाडांना धमकी, काय म्हणाले शशिकांत शिंदे
आव्हाडांना धमकी, काय म्हणाले शशिकांत शिंदे.
हल्ल्यासाठी गुंड विधानभवनात आणले; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हल्ल्यासाठी गुंड विधानभवनात आणले; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
..तो आमदार खुणावतो अन् मारहाण सुरू होते, आव्हाडांचा रोख नेमका कोणावर?
..तो आमदार खुणावतो अन् मारहाण सुरू होते, आव्हाडांचा रोख नेमका कोणावर?.
भास्कर जाधवांना हातवारे करणं भोवलं, विधान भवनाच्या पायऱ्यांवर लोटांगण
भास्कर जाधवांना हातवारे करणं भोवलं, विधान भवनाच्या पायऱ्यांवर लोटांगण.
Padalkar : तुम्हाला जमत नसेल तर मी बोलत नाही, पडळकर भरसभागृहात भडकले
Padalkar : तुम्हाला जमत नसेल तर मी बोलत नाही, पडळकर भरसभागृहात भडकले.
एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, 'विधान भवनाचं पावित्र्य ...'
एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, 'विधान भवनाचं पावित्र्य ...'.
भास्कर जाधवांवर का आली सभागृहात वारंवार माफी मागण्याची वेळ?
भास्कर जाधवांवर का आली सभागृहात वारंवार माफी मागण्याची वेळ?.
आव्हाडांच्या मुलीला पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिव्या अन्..
आव्हाडांच्या मुलीला पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिव्या अन्...