Photo : ‘तुझी लहान बहीण असल्याचा अभिमान…’, मृण्मयी देशपांडेच्या वाढदिवसानिमित्त गौतमीची खास पोस्ट

मृण्मयी देशपांडेच्या वाढदिवसानिमित्त तिची लहान बहीण गौतमी देशपांडेनं एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. (‘Proud to be your little sister…’, Gautami's special post on Mrinmayee Deshpande's birthday)

1/8
Gautami Deshpande
मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयी देशपांडेचं नाव घेतलं जातं. तिने अनेक आव्हानात्मक भूमिका अतिशय सहजपणे साकारल्या आहेत. आज मृण्मयीचा वाढदिवस आहे.
2/8
Gautami Deshpande
वाढदिवसानिमित्त तिची लहान बहिण गौतमी देशपांडेनं एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. सोबतच काही अनसिन फोटोसुद्धा शेअर केले आहेत.
3/8
Gautami Deshpande
मृण्मयीने अनेक छोट्या पडद्यावर आणि सिनेमांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. पण तिला पहिली ओळख कुंकू या मालिकेमुळे मिळाली. याच मालिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.
4/8
Gautami Deshpande
मोकळा श्वास, कट्यार काळजात घुसली, भाई: व्यक्ती की वल्ली अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये मृण्मयीने काम केलं आहे. कॉमेडीची बुलेट ट्रेन या शोचं मृण्यमीने निवेदनही केलं आहे.
5/8
Gautami Deshpande
गौतमीनं लहानपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.
6/8
Gautami Deshpande
मनोरंजन क्षेत्रात अनेक भावंडांच्या जोड्या आहेत. मोठ्या भावंडाच्या पावलावर पाऊल ठेवत धाकटी भावंडं आपलं स्थान निर्माण करत आहेत.
7/8
Gautami Deshpande
गौतमी सध्या ‘माझा होशील ना’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय.
8/8
Gautami Deshpande
गौतमीची ही पोस्ट सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.